Search Engine Optimization

Tuesday, January 7, 2020

बोध घ्यावा..

पैसे असुन साधं राहीलं तर *भिकारडा म्हणतात ...*

पैसा ब-यापैकी खर्च केला तर *माजुरडा म्हणतात ...*

सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर *बकबक करतो म्हणतात ...*

कमी बोललो तर *स्वतःला शहाणा समजतो म्हणतात ...*

दानधर्म नाही केला तर *कंजुष मारवाडी म्हणतात ...*

भरपुर दानधर्म केला तर *दोन नंबर पैसेवाला म्हणतात ...*

बायकोचं ऐकलं तर *बायकोचा बैल म्हणतात ...*

बायकोचं नाही ऐकलं तर *काहीतरी भानगड आहे म्हणतात ...*

तब्बेत चांगली तर *फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात ...*

तब्बेत कमी केली तर *काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात ...*

सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर *ह्याला काही काम धंदा नाही असं म्हणतात ...*

कार्यक्रमांना नाही गेलं तर *ह्याला माणुसकी नाही म्हणतात ...*

समाजासाठी काही केले तर *या पाठिमागे काही स्वार्थ असणार असं म्हणतात ...*

समाजासाठी काही नाही केले तर *काही कामाचा नाही असं म्हणतात ...*

*लोक पायी चालु देत नाहीत, अन गाढवावर बसुही देत नाहीत ...*

लोक सगळी अशीच असतात, ते त्यांच काम करत असतात, *आपण आपलं काम करायचं ...*

शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं, याचाच अर्थ 
*ऐकावे जनाचे करावे मनाचे*
🙏🏻👌🏻🙏🏻👌🏻🙏🏻

No comments:

Post a Comment