Search Engine Optimization

Monday, January 6, 2020

बाप कुठे काय करतो?

बाप कुठे काय करतो? 
तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो. 
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष? बाप कुठे काय करतो? 

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण बाप कुठे काय करतो? 

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही बाप कुठे काय करतो? 

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… बाप कुठे काय करतो?

No comments:

Post a Comment