Search Engine Optimization

Friday, January 3, 2020

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी* वापरुन वडापाव विक्री "

*"मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी* वापरुन वडापाव विक्री "

तुम्ही प्रवासात आहात , *बस-स्टँण्ड* मध्ये गाडी थांबली , कळकट ,मळकट कपडयातला पोऱ्या , थंडगार वडा आणि पाव वड्डा पाssssव.....असं ओरडत येतो आणि रद्दी कागदात घाणेरड्या हाताने गुंडाळून मिरची सहित देतो ! 

गरज असली की खातात कि नाही लोक ?

पण तेच तुम्ही ट्राफीक सिग्नलवर वेल ड्रेस्ड मुलं , एक बॉक्स , त्यात गरम वडा , पाव , टिश्यू पेपर , *छोटी पाणी बॉटल आणि किंमत 20 रू .*

कोणतं पार्सल आवर्जून घ्याल ??

*गौरव लोंढे* 
या , मराठमोळ्या मुलाच्या डोक्यातून निघालेली भन्नाट आयडीया 
*Traffic WadaPav* या ब्रॅण्डखाली त्यांची सहा जणांची टीम जोरदार पणे ठाणे ( पश्चिम) मध्ये राबवत आहे .

सबकुछ हायटेक ,, स्वतःचा ड्रेसकोड , वेबसाईट, फेसबूक पेज , आणि ग्राहकाला गरम गरम देण्याची जिद्द , हे सगळं कॉम्बीनेशन  एवढं भन्नाट जमलंय कि , हे स्टार्ट-अप फार लवकर ग्रो करेल .

आज त्यांची सहाच जणांची टीम हे करतेय उदया ही नक्कीच वाढणार वादच नाही !

हा व्यवसाय छोटा असला तरी यांनी खूपच जास्त मॅनेजमेंट प्रिसिंपल्स इतक्या परफेक्ट पणे पाळलेत कि , यांना कोणीच रोखू शकत नाही .

ती प्रिंसीपल्स खालीलप्रमाणे .

*(1) Just in Time/zero inventory :* 
आजकाल कोणतीच मोठी कंपनी खूप जास्त माल स्टॉक करत नाही , त्यांनी अशी व्यवस्था केलेली असते कि पाहीजे ते मटेरियल *"अगदी त्या वेळेत "* त्या ठिकाणी पोहचेल .
एखादा स्टॉल टाकून बसू शकले असते पण वेळेवर ग्राहकाच्या हातात देणे ही *Just in Time* स्ट्रॅटजी आहे .

*************************************

*(2)Excellent Customer service :*
इथे यांनी टिश्यू पेपर , छोटी  पाणी बॉटल सुद्धा देऊन एक लेवल पुढे जाऊन कशी सर्वीस दिली जाते? हे दाखवून दिलय ! 

**********************************

*(3) Attractive Packaging :*

बरेच नवीन व्यावसायिक अती उत्तम प्रॉडक्ट्स बनवतात पण खर्च वाचवण्यासाठी पॅकेजींग सो-सो करतात , 
आजकाल चा ग्राहक कोणतीही पदार्थ तोंडाने खाण्याअगोदर डोळ्याने खातो , आणि मग पुढचा निर्णय घेतो .
***********************************

(4): process delegation

बऱ्याच नवव्यावसायिकांची चुक होते कि, ते एकटेच सगळी ऑपरेशन्स संभाळत बसतात , पण कित्येक बिझनेस हे फक्त टिमवर्क नेच केले जातात , यासाठी *written process and delegation* याचा वापर करावा लागतो 

* **********************************"*

(5) Ask for Referrals :

कोणताही व्यवसाय ॲड साठी प्रचंड खर्च करतो तेंव्हा कुठेतरी त्याला लोक ओळखायला लागतात , पण हे लक्षात घ्या आजच्या जमान्यात *word of mouth* सारखं प्रभावी माध्यम नाही त्यामुळेच यांनी पॅकेट वरच अपील केलीये कि , तुम्ही आमची स्टोरी फेसबूक आणि व्हाट्स अपवर शेअर करा ! 

Smart !! 

ही भन्नाट आयडीया आहे ! 
हा पठ्या लवकरच खूप प्रसिद्ध होणार .

चला तर मग आपण पण त्याला थोडं प्रसिद्ध करूया ! शेवटी आपला मराठी पोरगा काहीतरी नवीन बिझनेस मॉडेल डेव्हलप करतोय .

कधी ठाण्यात गेलात आणि यांच्या कर्मचाऱ्याची भेट ट्राफीक मधे झाली तर आवश्य खरेदी करा ! आणि प्रोत्साहन दया ! 

ही स्टोरी होती .
*"Traffic vada pav व गौरव लोंढेची*
Teen Haath Naka flyover ,
Bhakti Mandir ,
Paach Pakdi ,
Thane West 
Maharashtra .या आपल्या
भावाला नक्की व्हायरल करा !
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment