Search Engine Optimization

Thursday, January 2, 2020

​​हा सुंदर जन्म पुन्हा नाही

एक सांगू का

टेन्शन घ्यायचंच नाही​...

कोणासाठी किती काहीही करा,काही ऊपयोग नाही.
आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... ​ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो​...
 आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... 
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."  
     
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या;.; सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात. 
      ​​नेहमी हसत रहा​​ 

⚜ ​​हा सुंदर जन्म पुन्हा नाही​​⚜

No comments:

Post a Comment