Search Engine Optimization

Monday, January 6, 2020

हे जीवन सुंदर आहे.

*हे जीवन सुंदर आहे...अशी आंतरिक मानसिकता ठेवा व ते सुंदर जगायला सुरवात करा.....*     

*सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच नसतात, काही आपल्या जवळपासही असतात*
मी माझी पत्नी व मुलगी माझ्या गाडीने एका ठिकाणी चाललो  होतो.  मी आरामात गाडी  चालवत होतो तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली. मी जोराचा  ब्रेक लावला  आणि कार आणि माझे गाडीचा  अपघात होता-होता राहिला. कारचालकाची चूक असूनही तो रागामध्ये मला घालून-पाडून बोलू लागला.

मी  कारचालकावर क्रोधीत झालो  नाही आणि त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेलो. पत्नीला व माझ्या मुलीला कार चालकाचे वर्तन पाहून खूप राग आला होता आणि माझ्या मुलीने  मला विचारले- बाबा त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिले? त्याची चूक असूनही तो तुम्हाला किती वाईट बोलून गेला. आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो.

मी म्हणालो, हे बघ बाळ अनेक लोक  कचऱ्याचा ट्रक प्रमाणे असतात. हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात. *ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदा. क्रोध, घृणा, चिंता, निराशा इ*.

अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याचा शोधात राहतात. यामुळे *मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दुरूनच स्मितहास्य करून त्यांना वाटी लावतो. कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मीसुद्धा कचऱ्याचा एक ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील*.

मला असे वाटते की, *आयुष्य खूप सुंदर आहे*. यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा. आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की, *सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही फिरत राहतात*.

 शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने (घासफूस) भरून टाकतो. याचप्रमाणे *आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवतात*. 

 ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत राहतो. *सुखी माणूस सुख, दुःखी माणूस दुःख, ज्ञानी माणूस ज्ञान, योगी माणूस योग,  भ्रमित माणूस  भ्रम आणि भयभीत माणूस भय वाटत राहतो*.

 - जो स्वतःवरच प्रेम करू शकत नाही, कायम दुःखी आणि आजारी राहणे पसंत करतो त्याला इतरांचे सुख तरी कसे भावणार. तो इतरांवर निर्व्याज प्रेमही करू शकत नाही
     *म्हणून स्वतःही खूष राहा व इतरांना पण खूष  ठेवून आपल्या पुण्याइची बँक भरा*

*म्हणून मी नेहमी माझ्या कडे येणाऱ्या साधकाना सांगतो हे जीवन सुंदर आहे...अशी आंतरिक मानसिकता ठेवा व ते सुंदर जगायला सुरवात करा.....* 
https://www.youtube.com/channel/UCCtzjU_bsdm0cKxxsieDSEg
*योगसद्गुरु*

No comments:

Post a Comment